डहाणू दि. 16 मार्च : कोव्हीड साथरोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी डहाणू शहरातील तारपा चौक येथे उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या मंडपाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ह्या अस्थायी पोलीस चौकीच्या माध्यमातून गोरगरिबांची लूट केली जात असल्याचा पक्षाचा आरोप आहे. हा मंडप त्वरीत हटवावा, अन्यथा लोक एकत्र येऊन तो उध्वस्त करतील व त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदासुव्यवस्थेच्या प्रश्नाची जबाबदारी नगरपालिका व प्रशासनाची असेल असा इशाराच माकपातर्फे डहाणू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे.