डहाणू दि. 14: येथील अदाणी पॉवरच्या डहाणू औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली असून या वृत्तास अदाणी पॉवर व्यवस्थापनाने दुजोरा दिला आहे. एका अभियंत्याची पत्नी असलेली ही महिला सकाळी वसाहतीतील बगिच्यामध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेली असता, तीच्या डोक्यात विटेच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला. पिडीतेला डहाणू शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थीर आहे. औष्णिक प्रकल्पातील ह्या घटनेमुळे अंतर्गत सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
घटना दाबण्याचा नवा ट्रेंड: सुरुवातीला हल्ल्याबाबत, कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांना गुप्तता बाळगण्याची ताकीद देण्यात आली होती. मात्र तरीही बातमी दैनिक राजतंत्रच्या हाती लागल्यानंतर, घटनेची चौकशी करण्यासाठी प्रकल्पाचे सुरक्षा अधिकारी कर्नल किरण गुरव यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळालेला नाही. जनसंपर्क अधिकारी विजयेंद्र भावसार यांच्याकडे विचारणा केली असता, चौकशी करुन सांगतो उत्तर मिळाले व थोड्या वेळात घटनेला दुजोरा दिला असला तरी अधिकृतपणे तपशील जाहीर केलेला नाही. सायंकाळपर्यंत सविस्तर माहिती व्यवस्थापनातर्फे दिली जाणार असल्याचे भावसार यांनी सांगितले आहे. 14 मार्च रोजी एका मजुराच्या अपघाती मृत्यूबाबत देखील अशीच गुप्तता पाळण्यात आली होती.
संबंधित बातमी वाचा: – 14 मार्च 2020 रोजी कोळश्याच्या जहाजावर, ठार झालेल्या झारखंडच्या मजूरांच्या टाळूवरील लोणी कोणी खाल्ले?
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV