
डहाणू दि. ९: मुलींनी मोठे होताहोता दुर्बल किंवा बिचारी बाई नव्हे तर सक्षम नागरिक म्हणून स्वतःला घडवावे असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थीनींशी बोलताना केले. त्यांनी विद्यार्थीनींना भारतीय संविधानाची तोंडओळख करुन दिली. डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधीर कामत यांनीदेखील विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.
संजीव जोशी यांनी भारतीय संविधानाची तोंडओळख करुन देण्याचे कार्य हाती घेतले असून आज त्यांचे शनिवारी (८ सप्टेंबर) २९ वे व्याख्यान संपन्न झाले. भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्री पुरुष समानतेचे तत्व सांगितले असले व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असले तरी याबाबत महिलांनी पुरेशी माहिती घेतल्याशिवाय हेतू साध्य होणार नाही. आणि म्हणून महिलांनी आपली पूर्ण क्षमता विकसित करुन सक्षम नागरिक म्हणून लोकशाही समृद्ध केली पाहिजे असे विचार जोशी यांनी यावेळी मांडले.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!