डहाणू, सोमवार, दि. 25 डिसेंबर : दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी के. जे. सोमैय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या (मुंबई) राष्ट्रीय सेवा योजनेच्या दुसर्या बॅचच्या शिबिरार्थींशी भारतीय संविधान, राईट टू एज्युकेशन, भारतीय दंड संहिता, मानवी हक्क आणि एकंदरीतच लोकशाही व्यवस्थेबाबत संवाद साधला. भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि समाजात लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी संजीव जोशी यांच्या पुढाकाराने 2 सप्टेंबर 2017 पासून मिशन भारतीय राज्यघटना हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करुन दिली जाते. विशेषतः विद्यार्थीवर्गाशी या विषयावर संवाद साधला जात आहे.