दि. 29 : लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांनी अधिकाधिक सक्रिय झाल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी तलासरी तालुक्यातील कोचई येथे बोलताना केले. ते गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थींशी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर बोलत होते. यावेळी जोशी यांनी भारतीय राज्यघटना, भारतीय दंड संहीता, शिक्षणाचा हक्क, पंचायतराज व्यवस्था, पेसा कायदा याविषयी थोडक्यात माहिती दिली.