डहाणू शहरात आणखी 2 डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह

0
5439

दि. 23: कालच्या दिवसांत पालघर तालुक्यात नवे 50 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले असून त्यातील 28 जण एकट्या बोईसरचे आहेत. 7 जण पालघर नगरपरिषद क्षेत्रातील आहेत. 15 जण परिसरातील आहेत.

डहाणू तालुक्यात कालच्या दिवसांत 33 नवे कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून त्यातील 14 चिंचणीचे, 6 जण डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील व 5 जण आशागड येथील आहेत.

डहाणू शहरातील एका महिला गायनाकॉलॉजीस्टला कोरोना बाधा झाली आहे. सर्जन पतीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या मुंबईतील रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्याशिवाय शहरातील एका होमिओपॅथी डॉक्टर व त्याच्या पत्नीचा अहवाल देखील कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.