जव्हार, दि. 22 : पालघर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी पालघरमधील साखरे येथील हरिश्चंद्र वझे यांची तर उपाध्यक्षपदी डहाणूतील बोर्डी येथील भालचंद्र चुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवार, 21 मार्च रोजी जव्हार पेन्शनर्स भवनात कोरोनासंदर्भात सर्व निकषांचे पालन करुन संस्थेतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच या सभेत तात्कालीक अध्यक्षपदाची जबाबदारी महेंद्र काळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर सचिव पदी तलासरीचे रमेश राऊत, उपसचिव पदी वाडा येथील प्रल्हाद सावंत, खजिनदार पदी सोमनाथ कोडीलकर (खोडाळा) व सल्लागार पदी मावळते अध्यक्ष विनायक शेळके यांची एकमताने निवड करण्यात आली व तसा ठराव संमत करण्यात आला. अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना, वझे यांनी सर्वांचे आभार मानून माजी अध्यक्षांची ध्येय धोरणे आणि कार्यप्रणालीनुसार संस्थेचा कारभार चालू राहील, अशी ग्वाही दिली. दरम्यान, नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.