करोना : धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई; अन्यथा कारवाई होणार!

0
3416

पालघर, दि. 22 : राज्यात व जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने यंदा होळी (धुलीवंदन) सण साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी याबाबत आज, सोमवारी यासंदर्भात आदेश निर्गमित केले असुन होळी सणादरम्यान लोकं एकत्र आल्याने करोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसार्ट किंवा सार्वजनिक सभागृहांमध्ये धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51(ब), भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार दंडनिय अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.