आज (9.11.2020) बसला 3.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

0
2946

डहाणू दि. 9 नोव्हेंबर: आज पालघर जिल्हाला पहाटे 5.31 वाजता 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू तलासरी तालुक्यात 20.14 अक्षांश व 72.88 रेखांशावर 5 किलोमीटर खोलीचा असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. भूकंपामुळे काही नुकसान झाल्याची माहिती अजून हाती आली नसली तरी तूलनेने हा धक्का अधिक तीव्र असल्याने याबाबत खातरजमा केली जात आहे.