पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल? Total Voters: 242
Loading ...
[highlight]mahanews MEDIA / उल्हास पाध्ये [/highlight]
दिनांक ९: काल, गुरुवारी रात्री ११:२८ वाजता बोईसर औद्योगिक वसाहतीमधील नोव्हाफेन स्पेशालिटी या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंटुकुमार गौतम, जानू आदारिया आणि अलोक नाथ अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे बोईसर भोपाळ दुर्घटनेच्या दिशेने जात असल्याची भीती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बोईसर उद्योगनगरीत रात्रीच्या सुमारास घातक वायू सोडले जात असल्याची चिंता सतावत असतानाच ही घटना घडल्यामुळे बोईसरामध्ये राहणे जोखीमीचे ठरले आहे.
इ १०७ क्रमांकाच्या प्लॉट वरील या रासायनिक कारखान्यात रियाक्टर, बॉयलर व सॉल्व्हन्ट टाकीत एकापाठोपाठ १८ स्फोट झाले. या स्फोटांची तीव्रता इतकी होती कि यामुळे संपूर्ण बोईसर शहर हादरले. लोकांना भूकंप झाल्यासारखे वाटले व तशा अफवा देखील पसरल्या. लोक घराबाहेर पडले. सोशल मीडियावरून वाऱ्याच्या वेगाने या बातम्या पसरल्या. पहाटे २ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने याबाबत प्रेस नोट काढल्यानंतर लोकांना नेमके काय झाले हे अधिकृतरीत्या समजले. या दुर्घटनाग्रस्त नोव्हाफेन स्पेशालिटीच्या बाजूला असलेल्या आरती ड्रग्ज कंपनीत आगीत होरपळून ३ कामगारांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. १२ जखमींवर उपचार सुरु असून त्यातील एक जणांची प्रकृती गंभीर आहे. नोव्हाफेन स्पेशालिटीमधील ७ जखमी कामगारांवर उपचार केले जात असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. असे असले तरी लोकांना या आकडेवारीवर विश्वास नाही. अपघात घडला त्यावेळी कारखान्यात किती कामगार होते? व ते सुरक्षितपणे घरी पोचले किंवा नाही, हे तपासल्यानंतरच याबाबत खरे काय ते स्पष्ट होणार आहे.
कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागली. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आगीचे लोण आजूबाजूच्या आरती ड्रग्ज, युनिमॅक्स, प्राची, भारत रसायन आणि दरबार या कारखान्यांत पसरले. हि आग लांबलांबवरच्या इमारतींमधून देखील दिसत होती. अपघातात मोठी वित्तहानी झालेली असली तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नसल्याचे शासकीय यंत्रणांकडून सांगण्यात येते. दरम्यान अग्निशमन यंत्रणा त्वरित घटनास्थळी पोहोचली व आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. कारखाना संपूर्णपणे जाळून खाक झाल्यानंतरच अथक प्रयत्नानंतर आता आग नियंत्रणात आली असली तरी अजून काही भागात आग धुमसत आहे. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत १) संजय जावडे (२५); २) कैलास कुमार (२०); ३) दिनेश कुमार (२१); ४) सुनिल कुमार (२१); ५) सचिन राठोड (१९); ६) कैलास सोनावणे (२५); ७) उदय यादव (४२); ८) वक्सेत सिंग (६०); ९) मुकेश रावत (२४); १०) सुनिल यादव (२१); ११) उरविंद विश्वकर्मा (२०); १२) कुडूबाई (५५)