स्वच्छता हि सेवा व अंत्योदय अंतर्गत ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवडा 1 ऑक्टोंबर 15 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे आज दि. 02 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत खानिवडे ता. वसई जिल्हा पालघर येथे स्वच्छतेची पालखी काढून कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यानंतर मा. ना. श्री. सदाभाऊ खोत व मा.ना. श्री. विष्णु सवरा यांनी श्रमदाना करून शौचालयच्या शोषखड्डयांचे बांधकाम केले..
खासदार मा.चिंतामण वनगा यांनी जिल्ह्यातील गावा गावात स्वच्छतेची जनजागृती झाली आहे अंत्योदय अभियान पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवला पाहिजे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला गाव स्वच्छ करण्यासाठी रस्ता, परिसर घाण करणा-यासोबत गांधीगीरी करावी. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे . शासनावर अवलंबून न राहता प्रत्येकाने पुढाकार घ्यायचा आहे. मा.सदाभाऊ खोत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी जिल्हा हागणदारी मुक्त करून आदिवासी म्हणून ओळख असलेल्या पालघर जिल्हाने महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण केला आहे. असे सांगून प्रशासनाचे आभार मानले. मा.विष्णू सवरा, पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री, यांनी पालघर जिल्हा महाराष्ट्रात 12 वा जिल्हा हागणदारी मुक्त झाला आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वानी एकत्र यावे असे आवाहन केले. तसेच सर्व अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी आणि जनतेचे अभिनंदन केले.
आमदार विलास तरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मा.बळीराम जाधव, खासदार, मा.विजय खरपडे, अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, मा. संजय म्हात्रे,सभापती पंचायत समिती वसई, मा.मिलिंद बोरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद पालघर, श्रीम. संघरत्ना खिल्लारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पावस्व विभाग, श्रीम. शितल पुंड , गटविकास अधिकारी प.स. वसई, कार्यकारी अधिकारी अभियंता. पाणी व स्वच्छता विभागाचे तज्ञ व सल्लागार, विस्तार अधिकारी. गावचे सरपंच, उपसरपंच, शारदा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, खानिवडे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम.संघरत्ना खिल्लारे केले तर आभार प्रदर्शन श्रीम.शितल पुंड यांनी केले.