डहाणू (11.09.2020); डहाणू व तलासरी तालुक्यात आज रात्रीपासून भूकंपाचे 6 धक्के बसले आहेत. पहाटे 3.29 व 3.29 वाजताच्या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी तर सकाळी 7.06 वाजताच्या भूकंपाची तीव्रता 3.06 इतकी होती.
भूकंपाचेच्या धक्क्यांची वेळ व तीव्रता पुढीलप्रमाणे:
रात्री 3 वाजून 29 मिनिटांनी 3.5 रीश्टर स्केल, 3 वाजून 43 मिनिटांनी 2.8 रीश्टर स्केल, 3 वाजून 45 मिनिटांनी 2.6 रीश्टर स्केल, 3 वाजून 57 मिनिटांनी 3.5 रीश्टर स्केल, 5 वाजून 4 मिनिटांनी 2.2 रीश्टर स्केल, 5.45 वाजता 2.5 रीश्टर स्केल,7 वाजून 6 मिनिटांनी 3.6 रीश्टर स्केल अशा तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत.