कोरोना : पालघर तालुक्यात एकाच दिवसात 53 रुग्णांची भर; 3 मृत्यू

0
4326

पालघर तालुक्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत आज 53 ने भर पडली आहे. मोठा कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या बोईसर भागात आज, 24 जुलै रोजी आणखी 13 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर पालघर नगरपालिका क्षेत्रांत आज 10 नवे रुग्ण निष्पन्न झाले. तालुक्यातील मृतांचा आकडा 3 ने वाढून 16 वर पोचला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आज देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) आज 130 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पालघर तालुक्यात तर त्या खालोखाल डहाणू तालुक्यात 46 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे पालघर व डहाणू तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.