दि. 15 जून: पालघर जिल्ह्यातील प्रभारी मुख्याधिकारी चंद्रकांत केवजी पवार (48) याला कंत्राटदाराकडून लाचेपोटी स्वतःच्या फार्म हाऊसवर 3 लाख रुपयांचा रस्ता बनवून घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पवार हा पालघर उप विभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार आहे. पवार याने तक्रारदार कंत्राटदाराकडून दर महिना 3 लाख रुपये मागणी केली होती. त्याप्रमाणे एका महिन्याच्या हप्त्यापोटी स्वतःच्या फार्म हाऊसवर 3 लाख रुपये खर्चाचा रस्ता बनवून घेतला होता.
कंत्राटदाराने ठणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर 12 जून रोजी पडताळणी करुन 13 जून रोजी सापळा रचण्यात आला. विनामोबदला रस्ता करुन घेतल्याचे निष्पन्न झाल्यावर पवार विरोधात विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.