
https://imjo.in/vq7QpV
डहाणू 5 मे: भारतीय जैन संघटनेतर्फे आजपासून डहाणू तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी ” डॉक्टर आपल्या दारी ” हा उपक्रम सुरु करण्यात येत असून त्याद्वारे लोकांना किरकोळ आजारावर मोफत उपचार व औषधे उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमाला श्रीमती सुरेखा अमृत नहार व Radiant World यांचे पाठबळ लाभले आहे. सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात, लोकांना किरकोळ आजारांच्या उपचारांसाठी घराबाहेर पडावे लागू नये हा उपक्रमाचा विशेष हेतू आहे. आज पासून सेवेचे लोकार्पण करण्यात आले आहे. आज एका छोटेखानी कार्यक्रमात उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार विनोद निकोले, सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार धर्माधिकारी, नगराध्यक्ष भरत राजपूत, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष राजेश पारेख, माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख संतोष शेट्टी, माकपाचे कॉम्रेड चंद्रकांत घोरखाना, संयोजक प्रकाश नहार, अमृत नहार, सुरेखा नहार, सचिन नहार उपस्थित होते. सौ. भारती चेतन काकरिया यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

https://imjo.in/vq7QpV