काहीही अनुचित केलेले नाही; डॉ. आदित्य अहिरे यांचा खुलासा

0
2387

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 19 : आज दिनांक, 19 मार्च रोजी, सरावली (डहाणू) येथील अंबुजा सिमेंट गोडाऊन येथे अंबुजा सिमेंटतर्फे काम करणारे मजूर, वाहन चालक व तत्सम लोकांना कोरोना आजारापासून घ्यावयाच्या काळजीसंबधी मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलाविण्यात आले होते. सोशल माध्यमांपासून वंचित असलेल्या या मोजक्या व मर्यादित लोकांना वैद्यकीय व्यावसायिक म्हणून मी, कोरोना आजाराला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची माहिती दिली. मी माझे कर्तव्यच बजावले आहे. येथे केवळ लोकांना मार्गदर्शन केले. कुठलेही उपचार करण्यासाठी शिबीर आयोजीत करण्यात आलेले नव्हते. बाहेरचे कोणीही येथे आलेले नव्हते. कुठल्याही स्वरुपाची गर्दी जमवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे काहीही अनुचित घडलेले नाही. काही माध्यमातून गैरसमजातून शिबीर आयोजित केल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या. त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, असे डॉ. अहिरे यांनी म्हटले आहे.