
रस्त्यात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असताना टॅफिक पोलीस वसावे बाजुला उभे राहून सारा प्रकार पहात होता. पाटील यांनी त्याला कर्तव्याची जाणीव करून दिली व वाहतूक कोंडी झालेली असताना आपण बघ्याची भूमिका का घेत आहात ? असा प्रश्न विचारला. याचा वसावे याला राग आला व त्याने ६८ वर्षीय पाटील यांची कॉलर पकडली आणि त्यांना एखादया गुन्हेगारासारखे पोलीस चौकीत नेले. याबाबत पत्रकारांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली. यावर चव्हाण यांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून ट्रॅफीक पोलीस वसावे याची वाहतूक शाखेतून तडकाफडकी उचलबांगडी करुन नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तसेच याबाबत उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
पत्रकारांच्या शिष्टमंडळात पी. एम. पाटील यांच्यासमवेत मराठी पत्रकार परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष संजीव जोशी, सरचिटणीस हर्षद पाटील, परिषद प्रतिनिधी निरज राऊत, पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील, हितेन नाईक, संतोष पाटील, ज्येष्ठ पत्रकार समीर मणियार यांच्यासह अनेक पत्रकार सामील झाले होते.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!