प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात

0
2463
IMG-20180411-WA0275 प्रतिनिधी
जव्हार, दि. ११ : येथील पाचबत्ती नाका येथे मंगळवारी  ( दि. १० ) रात्री ११.५० च्या सुमारास राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेने नशेत असलेल्या चालकाचा ताबा सुटल्याने  पाचबत्ती नाक्याला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघातात येथे  राहणारे फक्रुद्दीन मुल्ला व त्यांचे भाऊ मुद्दसर मुल्ला यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना रात्रीच मुबंई येथील हिंदुजा रूग्णायात तातडीने हलविण्यात आले आहे. 
         हा अपघात एवढा भीषण होता कि, गाडीचे इंजिन जोरदार धडकेने तुटून पडले. या अपघातात पाचबत्ती नाक्यावर समोर बसलेल्या फक्रूद्दीन यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत असून पायासह   खांदा व छातीमध्येही फ्रॅक्चर असून मुद्दसर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघांनाही वैद्यकीय उपचारांसाठी मुबंई येथे हलविण्यात आले आहे.
        एका सर्पदंश झालेल्या रुग्णाला जव्हार येथील कुटीर रुग्णालयात घेवून ह्या रुग्णवाहिकेचा चालक सुधीर बोरसे हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवीत असल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला.  त्याचवेळी या शासकीय वाहनात   बेकायदेशीरपणे भाताच्या गोणी भरून वाहतूक केली जात  असल्याचे अपघातानंतर उघड झाले आहे. ह्या घटनेसंदर्भात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करित आहेत.