डहाणू शहरात आलेली पाहुणी निघाली कोरोना +Ve

0
3602
Dahanu K.T. Nagar
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

डहाणू दि. 24: मुंबईतून 4 दिवसांपूर्वी डहाणूतील केटी नगर येथील नातेवाईकांकडे आलेल्या 42 वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही महिला व तिचा मुलगा 20 मे रोजी सांताक्रूझ येथून डहाणूतील केटी नगर मध्ये पाहुणे आले होते. प्रवासात तीला त्रास झाल्यामुळे डहाणूतील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. फिनिक्स हॉस्पिटलने ह्या रुग्णाला डहाणू उप जिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे महिलेचा घशाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला असता अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. महिलेचा मुलगा व ज्यांच्याकडे ते आले होते, त्या कुटूंबातील 3 जण अशा 4 जणांना आधीच क्वारन्टाईन करण्यात आले आहे. त्यांचेही घशाचे नमुने घेण्यात आले असले तरी अहवाल प्राप्त झालेले नाहीत. डहाणू नगरपरिषदेने आज सर्व केटी नगर परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे. फिनिक्स हॉस्पिटलदेखील बंद करण्यात आले असून निर्जंतुकीकरण प्रक्रिया चालू आहे. परिसरातील सर्व सोसायट्यांनी स्वयंनिर्णयाने स्वतःचे क्षेत्र प्रतिबंधीत केले आहे.