20 मे रोजी पालघर रेल्वे स्थानकात जमा झालेल्या बाहेरच्या राज्यातील मजूरांनी पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांच्याशी हुज्जत घातली आणि शिंदेंमधील अधिकारीपणा जागा झाला. त्यांनी मजूराला कानशिलात मारली आणि लाथ देखील मारली. पालघर जिल्ह्यातून लाखांच्या संख्येने पर राज्यातील मजूर लॉक डाऊनमध्ये अडकले आहेत. ह्या मजूरांना घरी परतायचे आहे. लाखो मजूर धोकादायक पद्धतीने आपल्या घरी पोहोचले आहेत. हजारो लोक रेल्वेतून घरी जायच्या प्रयत्नांत आहेत. अशाच एका मजूराने हवे तर माझ्याकडूनही पैसे घ्या, पण मला जाऊ द्या अशी विनंती केली आणि मग त्यातून घसरलेल्या संवादाची गाडी तहसीलदारांच्या माणूसकी गमावणाऱ्या वर्तनापर्यंत गेली. ह्या तहसीलदाराविषयी लोकांमध्ये संतापाची लाट पसरली असून कारवाईची मागणी होत आहे.