डहाणू: पुन्हा सर्व दुकाने उघडणार! सम आणि विषम तारखांच्या निर्णयातून माघार

0
2961

डहाणू दि. 9: काल पासून डहाणू नगरपरिषद क्षेत्रात रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेला व दुसऱ्या बाजूची दुकाने विषम तारखेला उघडी ठेवण्याचा सुरु केलेला फॉर्म्युला, आजपासून मागे घेण्यात आला आहे. हा फॉर्म्युला केवळ पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू असून डहाणू शहरासाठी या आधीच्या आदेशाप्रमाणे अनुज्ञेय असलेली दुकाने सुरु राहतील. काल नगरपालिका प्रशासनाची अन्वयार्थ लावण्यात चूक झाल्याने सम विषम फॉर्म्युलाची अंमलबजावणी सुरु झाली होती. ही चूक निदर्शनास आल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला.