डहाणू दि. 5 ऑगस्ट: काल दिवसभर व रात्री पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला व ठिकठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे पुर आले. डहाणू तालुक्यात एका दिवसात सरासरी 46.5 सेमी पाऊस पडला. काल रात्री शेणसरी येथेही पुरपरिस्थिती निर्माण झाली. तेथील 5 वर्षीय चिमुरडी ममता विजय लिलका ही रात्री 2 च्या सुमारास पुराच्या भयंकर प्रवाहात वाहून गेली. मात्र सुदैवाने तिच्या हाती झाडाची फांदी लागली आणि ती तिने गच्च धरुन ठेवली. सकाळी 6 वाजता तिला शोधण्यात यश मिळाले. तिच्यावर सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी उपचार घेत असलेल्या मुलीची व तिच्या कुटूंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

- तुम्ही Youtube वर News Channel किंवा News Portal चालवता का? मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे!
- केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू!
- मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक
- घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी
- महिलेला दोन लाखाचे सोन्याचे दागिने रेल्वे पोलिसांनी केले परत
